बांदा शोटाईम ग्रुपचा स्नेहमेळावा उत्साहात

सलग 20 वर्षे रसिकमनावर राज्य करणाऱ्या आठवणी पुन्हा झाल्या जाग्या
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 16, 2023 19:02 PM
views 150  views

बांदा : बांदा शोटाईम ग्रुपचा स्नेहमेळावा व सत्कार सोहऴा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.महाराष्ट्र व गोव्यासह विविध भागात 1990 पासून सलग 20 वर्षे रसिकमनावर राज्य करणाऱ्या बांद्याच्या दीपावली शोटाईमच्या आठवणी या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा जागवीण्यात आल्या. 


या स्नेहमेळाव्याचे उद् घाटन शोटाईमचे ज्येष्ठ आयोजक भाई शिरसाट यांच्याहस्ते दिपप्रज्वनाने झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती प्रमोद   कामत,बांदा सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच जावेद खतिब,माजी जि.प.सदस्य श्वेता कोरगांवकर ,माजी सभापती शितल राऊऴ, प्रसिद्ध व्यापारी भाऊ वळंजू , उद्योजक नारायण पित्रे,बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी,ग्रा.पं.सदस्य रुपाली शिरसाट,


माजी  अध्यक्ष अनय स्वार,संयोजक मनोज गोवेकर,आयोजक तेजस परब,श्रीप्रसाद वाळके,ज्येष्ठ सदस्य अन्वर खान,सुशांत पांगम, निवेदक धनश्री धारगळकर आदी मान्यवर उपस्थित होते.


श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहात आयोजित या सोहळ्याच्या आरंभी गिरीकाका महाजन,पुरुषोत्तम पेडणेकर ,रविंद्र हरमलकर,संतोष परब,सुशांत नाईक (हार्मोनियम),अजित गवस (तबला) यांनी नांदी म्हणून शुभारंभ केला. त्यानंतर नारायण आकेरकर यांनी शोटाईमचे टायटल साँग सादर केले. प्रास्ताविकात रुपाली शिरसाट यांनी शोटाईमच्या कारकिर्दीचा विस्तृत आढावा घेतला. त्यानंतर नादश्री पुरस्कार प्राप्त गोव्यातील नामवंत सिंथेसाईझर वादक विष्णु शिरोडकर,शोटाईमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य अन्वर खान, संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्यावर पिएचडी संपादन केलेल्या डॉ.भक्ती महाजन आळवे,कै.डॉ.द.भि.खानोलकर चरित्र पुस्तकाचे लेखक प्रकाश तेंडोलकर यांचा  मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मंडऴाचे सर्व माजी अध्यक्ष अनय स्वार ,अजय महाजन,राजेश पावसकर,राजेश विरनोडकर,सिद्धेश महाजन,राकेश विरनोडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन उपस्थित माजी अध्यक्षांना गौरवीण्यात आले. संजू परब,प्रमोद कामत,     रुपाली शिरसाट,धऩश्री धारगळकर, कै.श्रीकांत उर्फ बापू गोवेकर परिवार, बांदा अलाईव्ह स्टँच्यू ग्रुप,  नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,संयोजक मनोज गोवेकर ,सुत्रसंचालक राकेश केसरकर, शोटाईम विशेषांकाचे संपादक आशुतोष भांगले,टायटल साँग गायक नारायण आकेरकर


यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार मुर्तींनी मनोगत व्यक्त करताना शोटाईमच्या आठवणी जाग्या केल्या. सरपंच प्रियांका नाईक यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. डॉ.भक्ती महाजन आळवे यांनी एक झाड चंदनाचे पुस्तकातील भागाचे वाचन केले. या कार्यक्रमस्थळी या पुस्तकाचा स्टॉल लावला होता त्याला वाचकांचा प्रतिसाद लाभला. 


प्रमोद कामत यांनी सांगितले की बांदा शोटाईम गृप हा एक वैभवशाली ग्रुप असून त्यांनी आपले कार्य अविरत सुरु ठेवावे ,त्यासाठी आपले सदैव सहकार्य लाभेल. अध्यक्षिय भाषणात संजू परब म्हणाले की बांद्याच्या शोटाईमची भव्यता , त्याला लाभणारा प्रचंड मोठा जनसहभाग व शोटाईम ग्रुपने मला दिलेले प्रेम मी कधीच विसरणार नाही.असा हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा नव्याने नव्या जोशात सुरु व्हावा त्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य लाभेल.


 यावेळी राजेश गोवेकर यांनी संपादीत केलेली दीपावली शोटाईमची जुनी क्षणचित्रे स्क्रिनवर प्रसारित करण्यात आली.तसेच समीर चराटकर यांच्या बहारदार गायनाचे सादरिकरण झाले. यावेळी हनुमंत नाटेकर,आबा नाटेकर,प्रेमानंद  महाजन,सुधिर शिरसाट,नंदू गोवेकर ,पांडुरंग बांदेकर,साईनाथ तेली,सर्वेश गोवेकर,साई विरनोडकर,संदेश पावसकर, अजिंक्य पावसकर,अर्णव स्वार,प्रथमेश गोवेकर, नाना मिशाळ आदी मंडळ सदस्य तसेच निमंत्रित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.