
बांदा : प्रधान मंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत बांदा - सटमट ते डिंगणे असा मंजूर झालेल्या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराच्या मनमानी व हलगर्जीपणा मुळे बंद आहे. वारंवार ठेकेदाराला कळवून याकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे 4 दिवसात सदरच्या रस्त्याच्या कामाला सुरवात नकेल्यास ग्रामस्थांच्या रोशाला सामोरे जावे लागणार असल्याचे ग्रामस्थ आनंद वसकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की बांदा सटमट डिंगणे हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ठेकेदाराने संपूर्ण रस्ता खोदाई करून माती टाकली. याला साधारण 20 ते 25 दिवस झाले. त्यानंतर सदरच्या रस्त्याच्या कामाला ठेकेदाराने कोणतेही काम केले नाही. त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांच्या घरात धूळ जाऊन मोठे नुकसान होत आहे. नागरिकांना व शाळकरी मुलांना ये जा करताना ही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 2 महिन्यात पाऊस सुरु होणार असून सदरचे काम पावसाळ्या पूर्वी नझाल्यास मोठा फटका इथल्या नागरिकांना सोसावा लागणार आहे. याचा सर्व विचार करून सदरच्या कामा बाबत ग्रामपंचायत तसेच ठेकेराला कळवून सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जात आहे.
वाडीतील ग्रामस्त प्रदीप काळंगुटकर, महेंद्र मांजरेकर, संजय केळुसकर, सुरज मांजरेकर, विठ्ठल केळुसकर, संतोष वीर, विवेक केळुसकर, विष्णू वसकर, शेखर गोरे, बाबली कळंगुटकर व आदी ग्रामस्थांनी वेळोवेळी ठेकेदार व ग्रामपंचायत सदस्य त्यांना फोन द्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून सुद्धा सदरच्या कामाकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे येत्या 4 दिवसात म्हणजे शुक्रवार पर्यंत सदरच्या रस्त्याच्या कामाला सुरवात न झाल्यास पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कामाच्या दिरंगाई बाबत निवेदन देण्यात येणार असल्याचे वसकर म्हणाले.