
बांदा : बांदावासीय माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे माझा व सहकाऱ्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास बांदा शहर विकास पॅनेलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. अर्चना सुशांत पांगम यांनी व्यक्त केलाय. मतदानासाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असून आमची सीट भरघोस मतांनी निवडून येणार अस सौ. पांगम म्हणाल्या. यावेळी शिवसेना उप तालुकाप्रमुख सुशांत पांगम, बांदा शहर विकास पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.










