
बांदा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा नं. १ केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत सुयश प्राप्त केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने ३० जुलै २०२२रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये कनिष्का राजन केणी ही विद्यार्थीनी २६६ गुण मिळवत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय शिष्यवृत्तीची मानकरी ठरली. किमया संतोष परब हिने जिल्हा गुणवत्ता यादीत ४६वा तर नेहा विजय शंभरकर हिने जिल्हा गुणवत्ता यादीत ८१वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला.
याचबरोबर शाळेतील आर्या शिंगडे, मानसी सावंत, मयुरेश पवार, शमिका केसरकर, दर्पण देसाई, अंश गवस , गौतम महाबळ हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक जे. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, जागृती धुरी, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस, प्रशांत पवार, गोपाळ साबळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर, बांदा सरपंच प्रियंका नाईक, केंद्रप्रमुख संदीप गवस, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.