उबाठा सेनेची फुगडी स्पर्धा ६ ऑक्टोबरला

Edited by: विनायक गांवस
Published on: September 13, 2024 13:52 PM
views 82  views

सावंतवाडी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वतीने उद्या १४ सप्टें रोजी   फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ती काही महत्त्वाच्या कारणास्तव तुर्त स्थगित करण्यात आली आहे. हा फुगडी कार्यक्रम येत्या दसऱ्याच्या काळात दि. ६ ऑक्टो रोजी घेण्यात येणार आहे अशी माहिती विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर फुगडी स्पर्धा आयोजित करून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुढाकार घेतला होता. या स्पर्धेसाठी महिला मंडळांनी नोंदणी केली होती. मात्र काही अडचणींमुळे ही स्पर्धा दसऱ्याच्या काळात दि.६ ऑक्टोबर रोजी मोठ्या जल्लोषात घेण्यात येणार आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.