
कणकवली : कुंभवडे गावातील मूळचे व सध्या मुंबई प्रभादेवी येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण लक्ष्मण सावंत (पटेल) यांचे बुधवार दिनांक ११ जून रोजी दुपारी वृद्धापकाळाने वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत प्रभादेवी येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, १ मुलगी, जावई, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुंभवडे ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण(भाई) सावंत यांचे ते वडील होत.
कुंभवडेत टेंबावरील बाळा या नावाने ते प्रसिद्ध होते. बालपण व शिक्षण कुंभवडे येथे केल्यानंतर ते नोकरी निमित्त मुंबई गेले. सचोटीने नोकरी करून प्रमाणिक आणि निष्कलंक आयुष्य जगले.आपल्या उमेदीच्या काळात आणि शरीर साथ देत होते तोपर्यंत दरवर्षी तरवा लावणीच्या वेळी कमीत कमी १ महिना तरी न चुकता सुट्टी घेऊन शेतीच्या कामांसाठी कुंभवडे गावी आवर्जून यायचेच. सुस्वभावी, प्रेमळ, मनमिळावू, परोपकारी आणि अत्यंत प्रामाणिक असे हे व्यक्तिमत्त्व आता अनंतात विलीन झाले आहे अशा शब्दात अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली.