दुचाकी अपघातात बाळकृष्ण मार्गी यांचं निधन !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 26, 2023 21:14 PM
views 579  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव कुंभारवाडी येथे दोन मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात महादेवाचे केरवडे मालाची राई येथील बाळकृष्ण केशव मार्गी (वय ६५) यांचे निधन झाले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा अमर बाळकृष्ण मार्गी यांनी खबर दिली आहे.

या अपघाताबाबत अमर बाळकृष्ण मार्गी यांनी दिलेल्या खबरीमध्ये असे म्हटले आहे की, महादेवाचे केरवडे मालाची राई ते माणगाव बाजार येथे बाजारासाठी माझी मोटरसायकल (एमएच ०७ व्ही २७१४) ही घेऊन मी व माझे वडील बाळकृष्ण केशव मार्गी जात असताना माणगाव बाजार येथून भरधाव वेगाने आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या संदेश परुळेकर मोटरसायकल नंबर (जीए १० डी २०८७) याने मोटरसायकलला समोरासमोर धडक दिली. यामध्ये मोटरसायकलच्या मागे बसलेले माझे वडील बाळकृष्ण मार्गी हे रस्त्यावर पडून त्यांच्या डोकीला मार लागला.

उपचारासाठी माणगाव आरोग्य केंद्र येथे घेऊन गेले असता ते मयत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या दिलेल्या खबरीवरून संदेश परूळेकर यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.