बळीराजा सुखावला !

Edited by: विनायक गावस
Published on: June 24, 2023 15:03 PM
views 136  views

सावंतवाडी : सावंतवाडीसह तळकोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल सायंकाळनंतर आज सकाळपासून पावसानं चांगली सुरुवात केली आहे. जोरदार कमबॅक करत सुरु झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे. तसंच पाऊस उशिरा आल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेल्या भागातील लोकांना देखील दिलासा मिळाला आहे.