
वेंगुर्ला: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उभादांडा विभागामधील विविध पदांवर नुकत्याच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. यात वेंगुर्ला तालुका मच्छिमार सेल तालुकाप्रमुख पदी उभादांडा माजी उपसरपंच गणपत केळुसकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर तालुका प्रवक्ते पदी सुशिल अर्जुन चमणकर यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच उभादांडा महिला विभाग प्रमुख पदी सावली सुदन आडारकर, शाखाप्रमुख पदी प्रकाश दत्ताराम मोटे, उपशाखाप्रमूख पदी शिवाजी राजाराम पडवळ, युवा शाखाप्रमुख पदी श्यामसुंदर प्रताप रेवणकर, युवती शाखाप्रमुख पदी तेजश्री गौरव गवंडे, प्रभाग १ च्या बूथ प्रमुख पदी गोपाळ सूर्यकांत तोरस्कर, प्रभाग क्रमांक २ बूथ प्रमुख पदी सॅमसन बस्त्याव फर्नांडिस, प्रभाग क्रमांक ३ बूथ प्रमुख पदी संजय बाबल पाटलेकर, प्रभाग क्रमांक ४ बूथ प्रमुख पदी शामसुंदर वेणुनाथ कोळंबकर, प्रभाग क्रमांक ५ बूथ प्रमुख पदी सुदन अनिरुद्ध आडारकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नीतीन मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख प्रतिक्षा पाटकर यांनी स्वागत केले.