
महाड : युवासेना महाड तालुका अध्यक्ष राकेश मोरे यांनी पदाचा राजीनामा दक्षिण रायगड युवासेना अध्यक्ष विपूल उभारे यांच्याकडे पाठवला आहे. त्यांनी व्हाटसअप द्वारे व्हिडीओ शेअर केला असून मी पुर्वी प्रमाणे फक्त सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले आहे. राकेश मोरे हे युवासेनेचे ताकदवार युवानेते आहेत. युवासेनेतील तळागाळात त्यांचा कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क आहे.
त्यांच्यासोबत युवासेना डिजीटल मिडीया तालुका अध्यक्ष तुकाराम साळुंके यांनी देखील राजीनामा दिला आहे. राकेश मोरे यांच्या राजीनाम्यामुळे आमदार भरतशेठ गोगावले व विकासशेठ गोगावले यांना मोठा धक्का बसल्याचे राजकिय चर्चांना उधाण आले आहे.