
देवगड : देवगड तालुक्यातील शिवसेना (उ.बा.ठा) कार्यालयामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना (उ.बा.ठा) तर्फे देवगड येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे वंदन करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, जयेश नर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर, उपतालुकाप्रमुख विष्णू (दादा) सावंत, महिला विभागप्रमुख रेश्मा सावंत, सीमा धुरी, रिया शेडगे (जामसंडे शहरप्रमुख), नगरसेवक विशाल मांजरेकर, शाखाप्रमुख गौरव सावंत, माधुरी ठुकरुल, श्रद्धा आंबेरकर, अमित तोडणकर यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.











