
कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली इथं 22 जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितरित्या मिळून रामरक्षा पठण केले.
त्यामध्ये मुलांचे प्रभू श्री रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित कथा, गायन ,श्लोक, गीतरामायण सादर केले. या कार्यक्रमामध्ये संस्थेचे डायरेक्टर संदीप सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकही उपस्थित होते.