बाल शिवाजी कणकवली स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का सावंत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 01, 2024 11:55 AM
views 201  views

कणकवली : कोकण विकासाचे अग्रदूत म्हणून ज्यांनी महनिय कार्य केले अशा बॅ. नाथ पै यांच्या जीवन चरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे व त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने नगर वाचनालय कणकवली तर्फे दिनांक 01/02/2024 रोजी नगर वाचनालय कणकवली येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये  बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल ची विद्यार्थीनी कुमारी तनिष्का संदीप सावंत(इयत्ता 9वी) हिने 'आजची परीक्षा पद्धती व गुणवत्ता' हा विषय घेऊन सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये तिचा प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.


तनिष्काच्या या यशाबद्दल अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सुलेखा राणे, खजिनदार रमेश राणे, संस्था सदस्य संदीप सावंत,  विनायक सापळे, संस्थेच्या समन्वयक प्रणाली सावंत शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.