बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Edited by:
Published on: December 29, 2024 19:13 PM
views 395  views

कणकवली : अनिरुध्द शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक २४ डिसेंबर २०२४ या रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कणकवलीतील बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात यंदा विद्यार्थ्यानी ' पदन्यास ' या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केलीत. ' पदन्यास ' हा विद्यार्थ्यांच्या पावलांनी साकारलेला नृत्याचा प्रवास होता. यात विद्यार्थ्यानी पारंपरिक भारतीय नृत्य शैलीसह समकालीन नृत्य शैलीच्या माध्यमांतून आपल्या कलाकौशल्याचे सादरीकण केले. ताल, लय,मुद्रा व हावभाव यांचा अनोखा संगम या नृत्याच्या माध्यमांतून दिसून आला या वर्षीच्या स्नेहसंमेलनाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे ' नृत्यार्पण गीत रामायण '. हे नृत्य नाट्य, ज्याचे सादरीकरण सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्यदिग्द्शिका दिपाली विचारे (ऋतुजा नृत्यालय, पालघर) यांच्या शिष्या सौ.प्रिती शिंदे आणि त्यांच्या ग्रुपने सादर केले. ज्यामध्ये रामायणातील प्रसंगांचे नृत्याद्वारे सादरीकरण केले गेले. ज्यामध्ये रामजन्म, सीतेचे स्वयंवर, वनवास, रावण वध आणि रामराज्यभिषेक या प्रसंगावर आधारित नृत्य, संगीत आणि अभिनयाचा अप्रतिम मिलाफ पाहायला मिळाला.

या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी माननीय अजयकुमार सर्वगोड व  मंगेश सावंत, अनिरुध्द शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सुलेखा राणे  तसेच संस्थेचे खजिनदार रमेश राणे , संस्थेचे संचालक संदीप सावंत ,  शैक्षणिक समन्वयक व मार्गदर्शिका सौ प्रणाली सावंत  , पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष  बलराम उईके सर, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनघा राणे,पालक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.  .

यावेळी दहावीतील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु . प्रणाली ठोंबरे हिचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाळेची आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. तनिष्का  सावंत हिला सन्मान चिन्ह देऊन  गौरविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका अश्विनी जाधव  सुप्रिया सावंत व आभार प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनघा राणे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.