बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलचा 'वार्षिक बक्षिस वितरण समारंभ' उत्साहात

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 10, 2024 14:31 PM
views 162  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल 'वार्षिक बक्षिस वितरण समारंभ' दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. या खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एन. बी. राणे यांनी केले.

त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यानी प्रशालेत शिक्षण घेत असलेल्या विषयाला अनुसरून विविध कला सादर केल्या. यात कथ्थक, अभंग, तबला सादरीकरण, कराटे, केजी मधील विद्यार्थ्याचे लाठीकाठी, संस्कृत गीत, गझल, हे कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले.  या कार्यक्रमामध्ये पालकांचा देखील सहभाग होता. यामध्ये इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी चे पालक सौ. शमिका मराठे यांनी आपल्या पाल्यासोबत नृत्य सादर केले व इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनीचे पालक श्री. गणेश गोडे यांनी विठ्ठलावर अभंग सादर केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. एन. बी. राणे व श्री. वामन तर्फे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार संस्थेच्या सचिव सौ. सुलेखा  राणे व खजिनदार श्री. रमेश राणे यांनी केला.

प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा श्लोक पठण स्पर्धा गोष्ट सांगण्याची व लिहण्याची स्पर्धा, संगीत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यानी सहभागी घेऊन विशेष प्रावीण्य मिळविले होते. या स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल्स आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. एन. बी. राणे यांनी पालकांशी संवाद केला व पालकांना असा संदेश दिला की नवीन पिढीशी जुळून घेण्यासाठी ज्ञानासोबत अद्ययावत राहण्यासाठी पालकांनी देखील आपले ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक आहे.  तसेच खाऊ गल्ली मध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. शालेय शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान शिक्षण हे देखील महत्त्वाचे असते. यामध्ये सराव न घेता विद्यार्थ्यांची कृतीशीलता दिसते. शालेय विद्यार्थ्यांच्या या खाऊ गल्ली कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान चांगले होते. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांनी शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध कलांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. शाळेमध्ये शिक्षणासोबत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. यामुळे  विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विशेष गुणांना वाव मिळतो, असे व्यक्तव्य केले.

या समारंभासाठी प्रमुख अतिथी श्री. एन. बी. राणे - प्रसिद्ध उद्योजक, सिंधुदूर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे, अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सौ. सुलेखा राणे, श्री. रमेश राणे, श्री. संदीप सावंत, श्री. विनायक सापळे, श्री. वळंजू, श्री. परशुराम झगडे, पालक - शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. प्रीती करंबेळकर, सहसचिव श्री. अरुण राणे, मुख्याध्यापिका सौ. गीतांजली कुलकर्णी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका शामली कदम वा शाळेतील विद्यार्थीनी कु. स्वर्णीमा हडकर व कु. हर्षिता बघेल यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी जाधव, शिल्पा तिवरेकर, प्रेरणा चिंदरकर, नेहा जामसंडेकर मंजुषा जामसंडेकर, नेहा मसुरकर, मधुरा कदम, संपदा नर, तृप्ती साळवी, जिशिना नायर, अनघा राणे, श्रीपाद बाणे, आनंद मेस्त्री, साबळे, गौरी परब, निलेश काळसेकर गौरव धामणकर सुवर्णा राणे, सावंत, मानसी गुरव यांचे अतिशय उत्कृष्ट असे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांनी मानले.