बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांची नादब्रह्म गोट फार्मला फिल्ड व्हीजीट

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 02, 2023 17:42 PM
views 234  views

कणकवली : कणकवलीतील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांचे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. भिरवंडे येथील नादब्रह्म गोट फार्म मध्ये इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट दिली. 

श्री. निलेश सावंत यांचे हे फार्म आहे. त्यांच्यासोबत डॉक्टर रुपेश खानविलकर आणि श्री कन्हैया चौहान सहकारी कार्यरत आहेत. गोट फार्म च्या क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांना बकरीच्या विविध प्रजाती, कोणत्या जातीच्या बकरी कोणत्या वातावरणात राहू शकतात, व्यावसायिक तत्त्वावर अशा उद्योगाचा काय फायदा होतो, बकरी एका वेळी किती पिल्लांना जन्म देते अशी उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. अशा क्षेत्रभेटीतून आपण शालेय अभ्यासक्रमावती रिक्त विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासास हातभार लागू शकतो. या क्षेत्रभेटीसाठी संस्थेच्या संचालिका सौ सुलेखा राणे, श्री संदीप सावंत सर,  मुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम, वर्गशिक्षिका अनघा राणे व सहाय्यक शिक्षक श्री आनंद मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले.