
कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये दिनांक 26/09/2023 ला सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत इयत्ता 9 वी मधील कु. मिथिलेश तळदेवकर आणि कु. आर्यन जाधव यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सुलेखा राणे, खजिनदार रमेश राणे, संस्था सदस्य संदीप सावंत, संस्थेच्या समन्वयक प्रणाली सावंत शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.