SSC RESULT ; बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवलीचा 100 टक्के निकाल

श्रावणी मराठे 97.40 टक्के मिळवत शाळेत पहिली
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 04, 2023 14:47 PM
views 121  views

कणकवली  : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था, मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवली चा शालांत परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला असून कु. श्रावणी राजेंद्र मराठे हिने 97.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कुमारी यशिका कल्पेश महाडेश्वर हिने 95.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. आणि कु. पायल शरद बांदेकर हिने 94.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

कु. संहिता पुरुषोत्तम अंधारी हिला 94.60% तर कु. श्रावणी प्रशांत दळवी हिला 94% गुण प्राप्त झाले आहेत. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलचे एकूण २७ विदयार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी, २० विद्यार्थ्यांना  प्रावीण्य श्रेणी प्राप्त झाली असून ७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.


यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संचालिका  सुलेखा राणे, खजिनदार रमेश राणे, सदस्य  संदीप सावंत, विनायक सापळे,  अभिजित सावंत, शैक्षणिक उत्कृष्टता संचालक  प्रणाली सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी, सर्व शिक्षक, पालकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.