देवगड पंचायत समितीमध्ये बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 21, 2024 14:26 PM
views 32  views

देवगड : पंचायत समिती देवगड येथे आदय पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती गटविकास अधिकारी श्रीम वृक्षाली यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी गटविकास अधिकारी उच्चस्तर वर्ग -१ वृक्षाली यादव यांच्या हस्ते आदय पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप , कृषि अधिकारी मदने , अधिक्षक कुणाल मांजरेकर , अधिक्षक मेधा राणे , कनिष्ठ सहाय्यक उमेश ठाकुर , आरोग्य विस्तार अधिकारी  प्रतिमा वळंजु ,वरीष्ठ सहाय्यक  विलास लोके , हवालदार अरुणा लाड , हवालदार रमेश चव्हाण , भगवान परब तसेच  अन्य मान्यवरांनी अभिवादन केले.