
सावंतवाडी : बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मशिदी व मदरशात हा सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करत शुभेच्छा देण्यात आल्या.
ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना संपल्यानंतर सुमारे ७० दिवसांनंतर बकरी ईद येते. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असतं. इस्लाम धर्मानुसार रमजानच्या सणानंतर बकरी ईदचं विशेष महत्त्व असतं.
विशेष म्हणजे या ईदला कुर्बानी केलेल्या बकऱ्याचे मटन गोरगरिबांना देण्याचे मोठे महत्त्व आहे.त्यानुसार कुर्बानी करून त्याचे वाटप गोरगरिबांमध्ये करण्यात येते.