गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजुर..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 30, 2023 11:34 AM
views 149  views

सावंतवाडी : प्रेम संबधातून डोक्यावर हातोडी मारुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजुर करण्यात आला आहे.आरोपी मनोहर अशोक गवस यास जिल्हा न्यायालयाने रक्कम रुपये 25000/- हजार चा जामीन मंजुर करुन आरोपी यांची जामीनावर मुक्तता केलेली आहे. याकामी आरोपी यांच्यावतीने अॅड स्वप्नील बबन कोलगांवकर व अॅड. संकेत अभय नेवगी यांनी काम पाहीले.

फिर्यादी हिने आरोपी मनोहर अशोक गवस विरुध्द दिनांक 2मे2023 रोजी आरोपी याने 1मे2023 रोजी सायंकाळी 4.15 वाजता मानाने फिर्यादी ही त्यांचे माटणे गवळाकडे येथील काजुबागेत काजु गोळा करीत असताना अगोदरपासुनच तेथे येवुन थांबलेला आरोपी याने फिर्यादी हिला तु माका लग्न करता करता म्हणोन आता मेरेन फसयता तुझो जीवच घेता असे म्हणुन फिर्यादी हिला जिवंत मारण्याचे उद्देशाने सोबत आणलेल्या लोखंडी हातोडीने फिर्यादी हिचे डोक्यावर व हातावर मारुन दुखापत केली.

तसेच आरोपी याने सोबत आणलेल्या प्लॅस्टीक बॉटलमधील पेट्रोल किंवा रॉकेल सारखा द्रव पदार्थ फिर्यादी  हिच्या अंगावर शिंपडुन फिर्यादी हिला लायटरच्या सहायाने पेटवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन आरोपी याचेविरुध्द फिर्यादी याचे तक्रारी वरुन दोडामार्ग पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 62/2023 भा.द.वि कलम 307, 506 अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याकामी आरोपी यांचावतीने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला होता. या जामीन अर्जाच्या सुणावणीच्या दरम्याने आरोपीच्या वतीने युक्तीवाद करताना अॅड. स्वप्नील बबन कोलगांवकर यांनी या गुन्हाशी आरोपीचा काहीही संबध नाही व आरोपीला खोटया केसमध्ये अडकविलेले आहे असे प्रथमदर्शनी दिसुन येते असा युक्तीवाद केला. दरम्यान, कोर्टासमोर आलेल्या वस्तुस्थितीवरुन आरोपी यांची जामीनावर मुक्तता केलेली आहे.