वेंगुर्ला जुन्या तहसिलदार कार्यालयाच्या कागदपत्रांच्या चोरी प्रकरणी संशयीतास जामीन मंजुर

Edited by: दिपेश परब
Published on: June 16, 2023 17:01 PM
views 119  views

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या बाजुला असलेल्या वेंगुर्ला तलाठी कार्यालयाच्या जुन्या स्टोरेज कॉटर्स मधून जमिनीचे फेरफार व महत्वाची सरकारी  कागदपत्रे चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय होता,त्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखलकेलेला होता.परंतु दी. १३/०६/२०२३ रोजी संवशयित आरोपी ईश्वर छगन सापकाळे,रा. वेंगुर्ला याला पोलिसांनी अटक केलेली होती.आरोपी याचेतर्फे ॲड. अनिल निरवडेकर यांनी जामिन अर्ज दाखल केलेला होता. त्याकामी वेंगुर्ला येथील प्रथमवर्ग  न्यायदंडाधिकारी साहेब यांनी ॲड. निरवडेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी याचा जामिन अर्ज मंजूर केला असून. आरोपीयाची रक्कम रु. १५०००/- च्या जामिनावर मोकळीक करण्याचा आदेश पारीत केलेला आहे.याप्रकरणी ॲड. अनिल निरवडेकर , ॲड. अशोक जाधव व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.