बांद्यात सापळा रचून पकडलेल्या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर !

Edited by: विनायक गावस
Published on: November 11, 2023 13:59 PM
views 153  views

सावंतवाडी : वनक्षेत्रपाल सावंतवाडी कार्यालयाच्या स्टाफसह केलेल्या कारवाईतील आरोपी सदगुरु मारुती नाईक व नारायण सावळाराम नाईक यांना  कुडाळ कोर्टात आज हजर केले असता तपासणीक अंमलदार यांनी वन कोठडीची मागणी केली होती. यावेळी वन कोठडीसाठी नमूद कारण संयुक्तिक नसून तपासकामत कोणतीही प्रगती नाही व विनाकारण आवश्यकता नसताना कोठडीची मागणी केलेली आहे असा युक्तिवाद अँड. परिमल नाईक केला.

हा युक्तिवाद ग्राह्य मानून वनकोठडी नामंजूर करण्यात आली. आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला असता आरोपींची प्रत्येकी 15,000/- रुपये जातमुचलक्यावर मुक्तता न्यायाधीश सौ. ए. जे. बाचूळकर यांनी केली. आरोपी तर्फे अँड. परिमल नाईक व अँड. सुशील राजगे यांनी काम पहिले.