बारावीत दोडामार्ग कॉलेजचा वाणिज्य शाखेचा बाबुलनाथ गवस अव्वल

Edited by: संदीप देसाई
Published on: May 25, 2023 21:52 PM
views 214  views

दोडामार्ग : बारावीच्या परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या कृष्णराव बाबूलनाथ गवस याने सर्वाधिक ९३.८३ टक्के गुण मिळवून दोडामार्ग तालुक्यातुन प्रथम येण्याचा बहुमान  पटकाविला आहे. तर न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी कॉलेजच्या कला शाखेच्या अनुष्का अनिल धर्णे ८६.५० टक्के द्वितीय


व विज्ञान शाखेच्या अपूर्वा अरुण लोंढे ८६.०० टक्के याने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तालुक्याचा निकाल 99.2टक्के इतका लागला आहे.


दोडामार्ग तालुक्यातून  एकूण ३०५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर तालुक्यात वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून१०० ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विज्ञान शाखेतुन १६६ विद्यार्थी परीक्षेस बसले असतां त्यापैकी १६५ उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले पैकी ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 


दोडामार्ग तालुक्याचा कॉलेज निहाय निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी- 

१) दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दोडामार्ग कला शाखा ९५.७४ टक्के- प्रथम मयूर रामदास गवस  ( ६१.६७), द्वितीय वैभवी संजय बांदेकर ( ६१.५०), तृतीय आदर्श सजीराम पारधी ( ५९.१७), 

वाणिज्य शाखा १०० टक्के - प्रथम कृष्णराव बाबूलनाथ गवस  ( ९३.८३ ), द्वितीय तनस्वी कैलास सावंत ( ८३.३३), तृतीय ललिता केसाराम चौधरी (७९.८३)

विज्ञान शाखा १०० टक्के- प्रथम कोमल कमलाकर मिसाळ (८५.००), द्वितीय रघुनाथ बाळकृष्ण धर्णे ( ६९.५०),  तृतीय सेजल महादेव कुबल ( ६४.०० ) यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थाप्रमुख विकास सावंत, मुख्याध्यापक शैलेश नाईक व शिक्षक पालक वर्गाने कौतुक केलं आहे.


२) सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियरकाॅलेज ऑफ सायन्स कुडासे ९८.६३ टक्के - प्रथम साहिल शिवाजी दळवी (67.17), द्वितीय नारायण मंगेश गवस (66.50), तृतीय दिक्षा प्रल्हाद सावंत (65.67), हा प्रशालेतून ऐकुण ७३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला.


३) न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी, कला शाखा १०० टक्के- प्रथम अनुष्का अनिल धर्णे ८६.५ टक्के, द्वितीय पंकजा सुशांत मणेरिकर ८१ टक्के, तृतीय गौरवी राजन कासार ७७.३३ टक्के, 

वाणिज्य शाखा १०० टक्के - प्रथम अपूर्वा अरूण लोंढे ८६ टक्के, द्वितीय अनिशा सखाराम गावडे ८३.३३ टक्के, तृतीय संकेत सिताराम सावंत ८२.१७ टक्के गुण मिळवून प्रथम आले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्याचे संस्था कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर व मुख्याध्यापक नंदकुमार नाईक व शिक्षक व पालक वर्गातून कौतुक होत आहे.