जुन्या दोस्ताची बाबू कुडतरकरांनी घेतली भेट

उबाठा सेनेच्या कार्यालयात जात जपली सावंतवाडीची संस्कृती
Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2025 13:49 PM
views 115  views

सावंतवाडी : सावंतवाडीची संस्कृती जपण्याच काम माजी नगरसेवक शिवसेना उमेदवार खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी केल. प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रचारा दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात जात त्यांनी जुन्या दोस्ताची भेट घेतली. यावेळी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनीही त्यांच स्वागत करत राजकारणापलीकडच्या मैत्रीचं दर्शन घडवून दिलं. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर व सीमा मठकर यांचीही भेट या कार्यालयात झाली. निवडणूकीच्या ऐन धामधुमीत देखील राजकारणापलीकडच चित्र शहरात दिसून आलं.


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि शिवसेनेचे उमेदवार खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी एकमेकांना शुभेच्छा देत सलोख्याचे दर्शन घडवले. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर व सीमा मठकर यांनीही ही संस्कृती जपली. निवडणुकीच्या प्रचारावेळी ही भेट झाली. प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेनेचे उमेदवारांचा प्रचार सुरू होता. याच दरम्यान निशांत तोरसकर यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात रूपेश राऊळ उपस्थित असल्याचे दिसले. राजकीय मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवत श्री. कुडतरकर यांनी थेट राऊळ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.


या भेटीत दोन्ही नेत्यांनी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. निवडणुकीसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या. यावेळी दोन्ही पक्षांचे प्रतिस्पर्धी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते दोन्ही सेनांचे सैनिक उपस्थित होते.