आंबोलीतले चेक पोस्ट काय मलिदा खाण्यासाठीच ?

बबन साळगावकर यांचा जळजळीत सवाल
Edited by: विनायक गावस
Published on: September 02, 2023 13:14 PM
views 717  views

सावंतवाडी : सतत सापडणारे मृतदेह यामुळे आंबोलीला आता गालबोट लागू लागलंय. यावरून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी खडेबोल सुनावालेत. 

आंबोलीचा व्यवसाय संपत चालला आहे. पर्यटनावरती याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. गोव्यातून एका महिलेचे प्रेत आंबोली घाटात टाकलं जातं. तेव्हा सिंधुदुर्ग पोलीस काय करत होते. असा प्रश्न निर्माण होत आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येताना चेक पोस्ट पार करून यावे लागते. यापूर्वी आम्ही आंबोली येथे आंबोली- आजरा -आंबोली- बेळगाव - चेक पोस्ट बसवण्याची मागणी केली होती. काही दिवस हा चेक पोस्ट सुरू होता. आता बंद आहे. पर्यटनाच्या मोठमोठ्या वल्गना केल्या जातात. परंतु, आंबोली पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न आजतागायत झालेले नाहीत. सिंधुदुर्ग पोलीस सुप्रिटेंड यांनी त्याची चौकशी करावी. आणि चेक पोस्ट काय मलिदा खाण्यासाठीच आहेत काय याचे उत्तर द्यावं. असे वक्तव्य माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलेय .