दिव्यांग सहाय्यता निधी वितरीत करण्यास विलंब

बबन साळगावकर यांनी वेधलं न.प. मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: October 26, 2023 19:10 PM
views 103  views

सावंतवाडी : नगरपरिषद सावंतवाडी यांच्याकडून दिव्यांग सहाय्यता निधी वितरीत करण्यास विलंब होत आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी शहरातील दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषदेच्या बजेटच्या पाच टक्के रक्कम ही वितरित करत असते. यावर्षी दिव्यांग व्यक्तींना निधी अजून मिळालेला नाही. निधी मिळण्यास बराच विलंब होत आहे तरी येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर सदर दिव्यांगांचा हक्काचा निधी वितरित करावा अशी विनंती बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे