
सावंतवाडी: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
श्री. साळगावकर हे पाच वर्षांहून अधिक काळ नगराध्यक्ष राहीले आहेत. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे ते एकेकाळी निकटवर्तीय होते. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक विलास जाधव यांसह समर्थकांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने शहरातील भाजपची ताकद आणखीन वाढली आहे. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सुवर्णा गावडे, बावतीस फर्नांडिस, मनोज घाटकर आदींसह साळगावकर यांचे समर्थक उपस्थित होते.










