दिघे साहेब असते तर गोळ्या घालून मारले असते‌ : बबन साळगावकर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 09:09 AM
views 637  views

सावंतवाडी : धर्मवीर -२ या  सिनेमेचा पहिलाच शो बघितला. हा सिनेमा म्हणजे बोगसपणा आहे. स्व. आनंद दिघे साहेबांनी गद्दारी करायला लावली असं त्यातून दाखवलं गेलं आहे.  शो बघून मनाला प्रचंड वेदना झाल्या. स्व. दिघे साहेब असते तर अक्षरशः गोळ्या घालून या लोकांना मारले असते‌ असं विधान माजी नगराध्यक्ष व जुने शिवसैनिक बबन साळगावकर यांनी केल. 



ते म्हणाले, जोपर्यंत सावज मैदानात येत नाही तोवर फायरींग होणार नाही. तोफ मात्र धडधडत रहाणार आहे. पर्यटनाची एक गाडी आणून दीपक केसरकर फिरवत आहे. २००७ ला २५ कोटीचा आंबोलीत उभारलेला प्रकल्प बंद आहे‌. तो प्रकल्प चालू करण्यासाठी केसरकरानी काहीच प्रयत्न केले नाही. रघुनाथ मार्केट पॅटर्न ते मतदारसंघात राबवत आहेत. कारण, गेल्या पंधरा वर्षांत रघुनाथ मार्केटची पाच वेळा उद्घाटन झालीत. निवडणूक झाली की ते बंद झालं आहे. हाच पॅटर्न केसरकर मतदारसंघात राबवत आहेत. धर्मवीर -२ हा सिनेमा बघितला. या सिनेमा म्हणजे बोगसपणा आहे. स्व. आनंद दिघे साहेबांनी गद्दारी करायला लावली असं त्या सिनेमातून दाखवलं गेलं आहे. पहिलाच शो बघून मनाला वेदना झाल्या. स्व. दिघे साहेब असते तर अक्षरशः गोळ्या घालून या लोकांना मारले असते‌ असं विधान माजी नगराध्यक्ष व जुने शिवसैनिक बबन साळगावकर यांनी केल.