भोसले कॉलेच्या बी.फार्मसीचा ९६ टक्के निकाल

Edited by: विनायक गांवस
Published on: July 04, 2024 12:30 PM
views 119  views

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाने बी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा निकाल ९६ टक्के एवढा लागला आहे. बी.फार्मसीच्या फायनल इयर परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण १२९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

यामध्ये गिरीश जयप्रकाश गावडे ८.९१ याने प्रथम, विद्याधर हरीशचंद्र वाजे ८.७३ याने द्वितीय तसेच प्रांजल आप्पा गवळी, तेजस्वी जीवन कडू, वंशिता जितेंद्र पाटील व तेजस नरेश वाडेकर या सर्वांनी ८.५५ पर्सेंटाईल गुण मिळवत संयुक्तपणे तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ. विजय जगताप, परीक्षा विभाग प्रमुख नमिता नार्वेकर व प्रणाली जोशी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.