बि. के. आयनोडकर यांचा सीईओ प्रजीत नायर यांच्या हस्ते सेवा निवृत्तीपर सन्मान..!

Edited by: संदीप देसाई
Published on: August 31, 2023 20:28 PM
views 61  views

सावंतवाडी : जिल्हा परिषदमध्ये तब्बल 38 वर्षे सेवा बजावून गुरुवारी सेवानिवृत्त झालेले ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता बि. के. आयनोडकर यांचा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते सेवानिवृत्तीपर सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 या सेवानिवृत्ती निरोप समारंभात श्री आयनोडकर यांनी दिलेल्या लोकाभिमुख सेवेबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गौरव उद्गार काढत त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत  जिल्हा परिषदचे अती. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गावडे व जि.  प. चे खाते प्रमुख आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेतील कार्यक्रमानंतर सावंतवाडी उपविभागीय कार्यालयातही उपविभागीय अधिकारी सेवा निवृत्त अधिकारी रमेश मठकर, उप अभियंता सुदेश राणे व उप अभियंता प्रफुलकुमार शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करून निरोप देण्यात आला. तर विविध गावांचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी श्री. आयनोडकर यांनी केलेल्या सहकार्य व मार्गर्शनसाठी अनेक सरपंच यांनी त्यांचे विशेष आभार मानत त्यांना सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.