
सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भव मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि. 01 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान आयुष्यमान आपल्या दारी , आयुष्यमान सभा, आयुष्यमान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आयुष्मान भारत कार्ड न काढलेल्या व या मोहिमेस पात्र 33329 लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा हिंवताप अधिकारी डॉ रमेश करतस्कर, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्व्यक डॉ प्रवीण गोरोले उपस्थित होते. यावेळी डॉ. सई धुरी यांनी आयुष्मान आपल्यादारी 3.0 नुसार जिल्ह्यामध्ये आतुष्मान आपल्यादारी उपक्रमांतर्गत सर्व पात्र लाभार्थांची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात येईल. आयुष्यमान सभेच्या माध्यमातून ग्राम पातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती ग्रामपंचायत च्या माध्यमातून करण्यात येणार असून या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट आयुष्यमान कार्ड व आबा काळ याबाबत जनजागृती करणे आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत असंसर्गजन्य, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्यमान मेळावाच्या माध्यमातून आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवार किंवा रविवार दिवशी आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वयोगटातील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. सई धुरी यांनी सांगितले.
तर जिल्ह्यात आतापर्यंत 92 हजार लाभार्थ्यांचे आभा कार्ड काढण्यात आले आहे, जिल्ह्यात अद्यापही आभा कार्ड योजनेसाठी पात्र असलेल्या 33 हजार 339 लाभार्थ्यांचे आभा कार्ड काढण्यात आलेले नाही, त्यामुळे केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत एक सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये आभाकार्ड काढले जाणार आहे तरी या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केल आहे.