कणकवलीत अनोख्या पद्धतीने मतदानाबाबत जनजागृती !

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 01, 2024 06:57 AM
views 247  views

कणकवली : कणकवली विद्यामंदिर हायस्कूल इथं मतदान जनजागृती संदेश देणारी मतदान करा अशी मानवी साखळी तयार करण्यात आली. विद्यामंदिर हायस्कूल हे उपक्रमशील हायस्कूल म्हणून प्रसिद्ध असून मतदानाची जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कणकवली नगरपंचायत व कलाशिक्षक प्रसाद राणे यांच्या नियोजनातून शिक्षक व विद्यार्थी यांच्या माध्यमातून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशाळेचे मुख्यद्यापक पी.जे.कांबळे, पर्यवेक्षिका व्ही. बी जाधव, शिक्षक वि. वी. बर्डे, नेताजी जाधव, जनार्दन शेळके, दिनेश मोर्ये, विदया शिरसाट, नेहा सावंत, वेदाती तायशेटे, वैभवी हरमलकर, कदम मॅडम, इतर शिक्षक, विद्यार्थी व नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

46 रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचाना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कणकवली शहरात नगरपंचायत तर्फे मतदारांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. स्विप कार्यक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत  मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये 10/04/2024 ते दि.19/4/2024 या दरम्यान मतदार सेल्फी पॉईंट हा उपक्रम, मतदार हस्ताक्षर अभियान, रांगोळी, मतदान जनजागृती संदेश देणारे पथनाट्य शहरामध्ये विविध ठिकाणी राबविण्यात आले आहेत. जनजागृती कार्यक्रमाकरीता बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व इतर यांनी देखील सहभाग दर्शविला असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

      तसेच गुरुवार दिनांक 02/05/2024 रोजी सकाळी ठीक 8:00 वा कणकवली नगरपंचायत कार्यालय ते आप्पासाहेब पटवर्धन चौक अशी लोकशाही दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, कणकवली शहरातील मतदारांनी यामध्ये सहभागी व्हावे व दि.07 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावावा. असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.