रश्मी माणगावकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ठाणे येथे वितरण
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 09, 2022 17:53 PM
views 241  views

सावंतवाडी : शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत कणकवली येथील विद्या मंदिर प्रशालेच्या उपक्रमशील विज्ञान शिक्षिका रश्मी राजेंद्र माणगावकर यांना 'वसंत स्मृती आदर्श शिक्षिका' पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. हा पुरस्कार ठाणे येथे भाजप शिक्षक आघाडी कोकण विभागाच्यावतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचे वडील वसंत डावखरे यांच्या नावाने हा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.

रश्मी माणगावकर ह्या विज्ञानाच्या उपक्रमशील शिक्षिका असून गेली ३५ वर्षे त्या अभिनव पद्धतीने विविध नाविन्यपूर्ण अध्यापन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटत आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंद होत आहे.