अनिल कांबळे यांना गुरु सेवा पुरस्कार प्रदान

Edited by: रुपेश पाटील
Published on: September 24, 2022 18:39 PM
views 247  views

सावंतवाडी : नेमळे विद्यालयाचे उपक्रमशील व हरहुन्नरी शिक्षक अनिल लक्ष्मण कांबळे यांना नुकताच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते 'गुरुसेवा आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सावंतवाडी येथे झालेल्या समारंभात शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते अनिल कांबळे यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे (सातारा), सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मराठी त्रैमासिकाचे संपादक भरत गावडे, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह विठ्ठल कदम, प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते.

     अनिल कांबळे हे नेमळे हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी अनेक विद्यार्थी उपयोगी कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत कार्य केलेले आहे. पुरस्कार वितरण समारंभाला अनिल कांबळे यांचे वडील लक्ष्मण कांबळे, आई शांता कांबळे, सौभाग्यवती अलका अनिल कांबळे, त्यांचे मूळ गाव माणगाव (तालुका चंदगड) येथील पोलीस पाटील मारुती कांबळे, दीपक कृष्णा कांबळे, अनुजा कांबळे, अभिनव कांबळे, आदी उपस्थित होते. अनिल कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अ. भि.राऊळ, प्राचार्य कल्पना बोवलेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 दरम्यान, पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर  कांबळे यांचा माणगाव येथील टिळक चौक सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी अनिल शिवनगेकर यांनी सत्कार केला. माणकेश्वर सार्वजनिक गणेश मंडळ व माणकेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनिल सुरतकर, सुधीर लांडे, अशोक बेनके यांनीही अनिल कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच माणगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच अश्विनी कांबळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, माजी तंटामुक्त गाव अध्यक्ष शामराव बेनके, तंटामुक्त समितीचे विद्यमान अध्यक्ष आप्पा सुरतकर, उपसरपंच बाबू दुकळे, सुनील कांबळे, ईश्वर वांद्रे, शंकर फडके, विश्वनाथ वाघराळे, बाळू हरकारे, अशोक होनगेकर, नंदू फडके यांनीही कांबळे यांचा सत्कार केला आहे.