रवी जाधव यांना डॉ. खानोलकर जनसेवा निधी ट्रस्टचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान

Edited by:
Published on: January 05, 2025 19:39 PM
views 127  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना बांदा येथील सेवाभावी कै. डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा निधी या ट्रस्टमार्फत  जाहीर झालेला आदर्श समाजसेवक पुरस्कार  प्रदान करण्यात आला आहे. अँड. देवदत्त परूळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा निधी या ट्रस्टमार्फत आदर्श समाजसेवक पुरस्कार रवी जाधव यांना जाहीर करण्यात आला होता. याच वितरण आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्काराची रक्कम पाच हजार रुपये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला अर्पण करणार असल्याचे रवी जाधव यांनी सांगितले.यावेळी अशोक पेडणेकर, समीरा खालील, हेलन निबरे, सुजय सावंत, विशाल नाईक आदी उपस्थित होते.