पुरस्कारप्राप्त उत्कृष्ट विज्ञान शिक्षकांचा केला कुटुंबीयांसह सन्मान..!

सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचा अविस्मरणीय उपक्रम
Edited by:
Published on: March 18, 2024 13:57 PM
views 991  views

सिंधुदुर्गनगरी :  विज्ञान विषयात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रात आपल्या विद्यालयाबरोबरच जिल्हयाचा नावलौकिक वाढविणाऱ्या क्रियाशील विज्ञान शिक्षकांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.  या निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाने या पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. रॉयल फार्म दोडामार्ग येथे सोनावल हायस्कूलचे राजाराम फर्जंद यांचा सत्कार करण्यात आला तर इतर पुरस्कारप्राप्त शिक्षकांना त्यांच्या स्वगृही सन्मानित करण्यात आले त्यात सत्यपाल लाडगावकर पेंढरी हायस्कूल ता.देवगड.

संजय शेवाळे इन्सुली हायस्कूल ता. सावंतवाडी. स्वप्निल पाटील कोकिसरे हायस्कूल ता. वैभववाडी सतिशकुमार कर्ले, जामसंडे हायस्कूल ता. देवगड.

मिलिंद गावकर असरोंडी हायस्कूल ता. मालवण, प्रिती सावंत, आर. पी. डी. हायस्कूल सावंतवाडी. नेहा दळवी बांदा हायस्कूल, ता. सावंतवाडी  सोनाली बांदेलकर

कलसुलकर हायस्कूल,सावंतवाडी. प्रणिता बांबूळकर नाटळ हायस्कूल ता. कणकवली या शिक्षकांना त्यांच्या कुटुंबासमवेत सन्मानित करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाद्वारे आजतागायत अनेक राज्यस्तरीय उपक्रम घेऊन जिल्ह्याची शैक्षणिक क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली असून त्यात राज्यस्तरीय विज्ञान मेळावा, राज्यस्तरीय विज्ञान नाट्य उत्सव, राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन या  सारखे दर्जेदार उपक्रम विज्ञान प्रेमींसाठी यादगार ठरले.सदर उपक्रमांतून विज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यात या सर्व विज्ञान शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असून त्यामुळेच आज ते पुरस्काराचे मानकरी ठरले असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर  यांनी व्यक्त केले.यावेळी दोडामार्ग गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, संस्था अध्यक्ष भाई परमेकर, प्रा.आर.वाय.पाटील, प्रा.वाघमोडे,विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष रघुनाथ कारेकर, सचिव प्रकाश कानुरकर,सहसचिव संतोष पवार,रुपेश कर्पे,कणकवली तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, दोडामार्ग तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष आनंदा बामणीकर, कुडाळ तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष अनंत साईल,वैभववाडी तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष अविनाश कांबळे, नांदगाव हायस्कूल मुख्याध्यापक सुधीर तांबे, माजगाव हायस्कूल मुख्याध्यापक भाऊसाहेब चवरे,घोणसरी हायस्कूल मुख्याध्यापक गणपतभाऊ राजम,उपक्रमशील शिक्षक शामसुंदर राणे, दयानंद कसालकर, प्रदीप सावंत, गंगाराम परब, सुनिल कदम, उपेंद्र पाटकर, युवराज सावंत,कृष्णा नाईक, संतोष मेथे,नंदकिशोर राऊळ,राहुल समुद्रे, धनराज सजगूरे, राजुदास जाधव, रोहीदास केंगले, पवार, राठोड, गावडे, स्नेहा कुबडे ,निधी मुद्राळे, सविता जाधव, अनुजा सावंत, जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे, उपाध्यक्ष सुहास देसाई यांसह जिल्हयातील विज्ञान शिक्षक तसेच पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे नातेवाईक व मित्रमंडळ उपस्थित होते.