डिजिटल पेमेंट माध्यमांबाबत जागृकता प्रशिक्षण वर्ग

Edited by: देवयानी वरसकर
Published on: March 07, 2024 14:31 PM
views 190  views

सिंधुदुर्ग : भारतीय रिजर्व बँक ऑफ इंडीयाच्या भूगतान और निपटान प्रणाली विभाग मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि., सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने दि. ७ मार्च रोजी डिजीटल पेमेंटबाबत  जागृकता सप्ताहाच्या निमित्ताने विविध डिजिटल पेमेंट माध्यमांबाबत जागृकता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सावंतवाडी येथील हॉटेल मँगो येथे करण्यात आले होते.

 कार्यक्रमाची सूरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. रिजर्व बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर श्रीमती बेनझीर शेख यांनी बचत गटांतील महिलांना RTGS, NEFT, IMPS, UPI, QR Code, ATM Card, Contactless Payment तसेच विविध डिजिटल पेमेंट पर्यायांच्या वापरासंदर्भात उद्‌बोधक माहिती देऊन हे पर्याय वापरत असतांना घ्यावयाची दक्षता व जागृकतेबाबत सविस्तर माहीती दिली. यावेळी रिजर्व बँक ऑफ इंडीयाचे असिस्टंट मॅनेजर शशांक एम्. पी. हे उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाला सावंतवाडी व आसपासच्या भागातील बचत गटातील महिलांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने केलेले कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद याबाबत रिजर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर रिजर्व बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर श्रीमती बेनझीर शेख यांनी प्रधान कार्यालयाला भेट देऊन बँकेला शुभेच्छा दिल्या.