
मालवण : आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. आतापर्यंत सरासरी 42 टक्के मतदान झाले आहे. मतदानाची टक्क्केवारी पाहता सुमारे 70 टक्के मतदान होईल अशी शक्यता आहे. चुरशीने झालेल्या लढतीकडे अवघ्या जिल्हा वासियांचे लक्ष लागून आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आमदार वैभव नाईक हे आचरेत प्रचारादरम्यान आणि आजही ठाण मांडून आहेत. भाजपचेही दिग्गज पदाधिकारी आचरेत प्रचाराची धुरा सांभाळत होते. माजी खासदार निलेश राणे यांनी आचरेत एकदा भेट देत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आढावा घेतला होता. मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपले मताचे दान टाकणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.