अतुल रावराणे यांनी घेतले श्रीरामाचे दर्शन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 18, 2024 07:13 AM
views 75  views

वैभववाडी : ठाकरे शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी एडगाव पवारवाडी येथील श्रीराम जन्मोत्सवास हजेरी लावून रामाचे दर्शन घेतले.त्यांच्या हस्ते अभिषेक सोहळाही संपन्न झाला. रामनवमी उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.एडगाव पवारवाडी येथील खंडोबा मंदीरात रामनवमी कार्यक्रम संपन्न झाला.याठिकाणी अतुल रावराणे यांनी जाऊन दर्शन घेतले.तसेच अभिषेकही केला.यावेळी पवारवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.