आंबोलीतील इतर वनक्षेत्रातील बांधकामाकडे वेधलं लक्ष !

दोन दिवसात पुरावे देतो, कारवाई करा : अमित परब
Edited by: विनायक गांवस
Published on: March 06, 2024 05:21 AM
views 114  views

सावंतवाडी : आंबोली येथील वनखाते, खाजगी वने, वनसंज्ञा असलेल्या जमिनीवरील अनधिक्रुत बांधकामावर कारवाई करण्यात आली. वनसंज्ञा उल्लेख असलेल्या परंतु वहिवाट असलेल्या जमिनीवरील बंगल्यांवर कारवाई केलीत यासाठी आपण नक्कीच अभिनंदनास पात्र आहात. खाजगी वने, वनसंज्ञा जमिनीवर जवळजवळ शेकडो बांधकामे झालेली आहेत. याबाबतचे कायदेशीर पुरावे आम्ही आपल्या कार्यालयात येत्या दोन दिवसात सादर करू, आशा आहे की पुरावे दिल्यानंतर त्याच तत्परतेची कार्यवाही तुमच्याकडून अपेक्षित आहे असं मत चराठा उपसरपंच अमित परब यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, आजच्या कारवाईत चार बंगल्यांचे ग्रामपंचायत आंबोली यांनी नंबरही दिले होते तरी देखील अगदी तत्परतेने ४८ तासात आपण कारवाई केली त्यासाठी आपले अभिनंदन.

त्याचबरोबर आंबोली, चौकूळ येथे आपल्या खात्याची नोंद असलेल्या म्हणजे वने, खाजगी वने, वनसंज्ञा जमिनीवर जवळजवळ शेकडो बांधकामे झालेली आहेत. याबाबतचे कायदेशीर पुरावे आम्ही आपल्या कार्यालयात येत्या दोन दिवसात सादर करू.  पुरावे दिल्यानंतर त्याच तत्परतेची कार्यवाही तुमच्याकडून अपेक्षित आहे. ही बांधकामे पाडण्याअगोदर ज्या प्रकारे तुम्ही कोर्टाकडे कॅव्हेट दाखल केले तसेच यापुढेही जी कारवाई आपण आम्ही दिलेल्या पुराव्यावर करणार त्यावेळी असेच कॅव्हेट कोर्टात सादर करावे. म्हणजे आपल्या चांगल्या व प्रामाणिक हेतुबद्दल कुणाच्याही मनात शंका राहणार नाही असं मत अमित परब यांनी व्यक्त केले आहे.