राहुल नार्वेकर आयोजित स्नेहभोजनाला युवराजांची उपस्थिती

Edited by: विनायक गावस
Published on: December 14, 2023 20:11 PM
views 156  views

सावंतवाडी : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी राजभवन लॉन्स नागपूर येथे हिवाळी अधिवेशन २०२३ निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचे आयोजन केलं होत. या कार्यक्रमास सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थिती लावली होती. 

या सोहळ्याला महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीठासीन अधिकारी, मंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते, दोन्ही सभागृहाचे सदस्य, सनदी अधिकारी वर्ग व नागपूर मधील वरिष्ठ अधिकारी यांनीही उपस्थिती दर्शविली होती.