ड्रेसिंग करण्यासाठी आला ; अचानक सुरक्षारक्षकावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

Edited by: विनायक गांवस
Published on: February 11, 2025 18:54 PM
views 129  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकावर कोयत्याने  एका युवकानं हल्ला केला. ड्रेसिंग करण्यासाठी हा युवक रूग्णालयात आला होता. यावेळी सुरक्षारक्षकांसह त्याने झटापट करण्याचा प्रयत्न केला. तदनंतर काहीवेळान थेट कोयता घेऊन सुरक्षारक्षकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

राजू धारपवार यांच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला 

सामाजिक कार्यकर्ते राजु धारपवार यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे सुरक्षारक्षकाचा जीव वाचला. यात राजू धारपवार यांच्या हाताला दुखापत झाली आहे.  मंगळवारी सायंकाळच्या सुमा रास ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी मोती तलाव येथे उडी घेण्याचा प्रकार देखील हल्लेखोर युवकाकडूंन करण्यात आला होता. आज तो ड्रेसिंग साठी रूग्णालयात गेला होता. यावेळी उपस्थितांसह त्यान झटापट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थितांनी त्याला रोखल. काही वेळानं थेट कोयता घेऊन सुरक्षारक्षकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न त्या युवकाने केला.

सामाजिक कार्यकर्ते राजु धारपवार यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे सुरक्षारक्षकाचा जीव वाचला. यात श्री. धारपवार यांना किरकोळ दुखापत झाली. यासंदर्भात सुरक्षारक्षकान पोलिसांत माहिती दिली आहे. संबंधित युवक हा शहरातीलच आहे.