सावंतवाडी न.प.चे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी पुन्हा संपावर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2025 19:06 PM
views 172  views

सावंतवाडी : नगरपरिषदेचे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरातील चौक हे कचऱ्याच्या ढिगांखाली आलेत. स्वच्छ सुंदर शहराची ही अवस्था झाल्यानं नागरिकांत संताप आहे. तर हक्काचे लोकप्रतिनिधी सभागृहात नसल्यानं प्रशासनाची एकाधिकारशाही वाढल्यान अनेक समस्या सहन कराव्या लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 


गेले तीन दिवस सावंतवाडीत नियमित होणारे कचरा संकलन बंद आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. केवळ नियमित कर्मचारी कामावर असून त्यांच्याकरवी काम सुरु आहे. मात्र, अनेक भागातील कचरा तसाच पडून असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर समस्या मार्गी लागत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.