पहलगाममध्ये हल्ला ; भाजपा ओरोसचा निषेध

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 24, 2025 19:21 PM
views 79  views

सिंधुदुर्गनगरी : पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा ओरोस मंडळाच्या वतीने ओरोस फाटा येथे पाकिस्तांनचे झेंडे पायदळी तुडवून व जाळून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पाकिस्तान मूडदाबादच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

काश्मीर मध्ये पेहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणाचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील 6 जणाना प्राण गमवावे लागले. या घटनेने संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात असून भाजपा ओरोस मंडळंच्या वतीनेही तीव्र संताप व्यक्त करत भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. 

 ओरोस फाटा येथे हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी झेंडे पायदळी तुडविण्यात आले व त्यानंतर ते जाळण्यात आले. यावेळी भाजपा ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, सुप्रिया वालावलकर,अमित भोगले, उदयकुमार जांभवडेकर, छोटू पारकर,गौरव घाडीगावकर, हार्दिक शिगले , दिनेश जैतापकर, सुनील जाधव ,उल्हास पालव, उदय पालव, शुभम राठिवडेकर, आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.