जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर यांचा भाजपात प्रवेश

Edited by:
Published on: January 04, 2025 21:24 PM
views 50  views

  कणकवली : जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व राष्ट्रवादी शरद व गटाचे प्रमुख कार्यकर्ते आत्माराम ओटवणेकर यांनी आज कणकवली ओम गणेश  बंगल्यावर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे खासदार नारायण राणे यांनी आत्माराम ओटवणेकर यांचे भव्य स्वागत केले.                                      

 यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, समीर सावंत, विठ्ठल देसाई श्रीम.नीता राणे, रवींद्र मडगावकर, महेश सारंग दिलीप रावराणे आदि संचालक  उपस्थित होते खासदार नारायण राणे, मंत्री महोदय नितेश राणे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या जिल्हा विकासासाठी व त्यांच्या बँक विकासासाठी असलेल्या कामकाज कार्यपध्दतीमुळेच  आपण  स्वत:हून हा पक्ष प्रवेश करत आहे असे यावेळी आत्माराम ओटवणेकर यांनी सांगितले.