नाडण पुजारेवाडीतून आत्माराम मोंडे बेपत्ता

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 08, 2025 18:48 PM
views 751  views

देवगड : आत्माराम विठोबा मोंडे ( वय -  ७८ ) हे देवगड तालुक्यातील नाडण पुजारेवाडी येथून बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा संदेश आत्माराम मोंडे (४७) यांनी देवगड पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.

पोलिसांन कडून मिळालेल्या  माहितीच्या आधारे तालुक्यातील नाडण पुजारेवाडी येथील आत्माराम विठोबा मोंडे हे ६ जून रोजी पहाटे ६ वा. च्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले. ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यांच्या सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, ते कोठेही आढळले नाहीत, अशी फिर्याद मुलगा संदेश यांनी देवगड पोलिसांत दाखल केली होती.हवालदार आशिष कदम यांच्या कडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.