वैभववाडी : शहरातील एसबीआय बँकेची एटीएम सेवा गेल्या वर्षाभरापासून बंद आहे.ती सेवा तात्काळ सुरू करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन तालुका मनसे व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने बँकेचे व्यवस्थापक यांना देण्यात आले.एटीएम सेवा लवकरात लवकर सुरू करावी अन्यथा मनसे स्टाईल भुमिका अवलंबली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.तालुक्यातील अनेक नागरिकांची खाती या बँकेत आहेत.अनेक व्यवहार या माध्यमातून होत असतात.मात्र गेल्या वर्षाभरा पासून बँकेच्या शेजारी असणार बँकेची एटीएम सेवा बंद आहे.त्यामुळे या बँकचे एटीएम असेलेल्या कार्ड धारकांना इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा व्यवहार करावा लागतो.महीन्यातून तीन पेक्षा अधिक वेळा इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यावर अधिकच शुल्क ग्राहकांना भराव लागतंय.तसेच नविन एटीएम रजिस्ट्रेशनसाठी ग्राहकांना कणकवली येथे पाठवलं जातं.याबाबत ग्राहकांनी अनेक वेळा तोंडी,लेखी तक्रार केली.मात्र संबंधित बँकेकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.अखेर आज (ता.८) येथील सजग नागरिक व मनसे पदाधिकारी यांनी बँकचे व्यवस्थापकांची भेट घेतली.ग्राहकांच्या तक्रारीसह अडचणी व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिल्या.तसेच बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत माहिती दिली.त्यांनी येत्या १५दिवसांत येथील एटीएम सेवा कार्यान्वित केली जाईल असं आश्वासन दिले.यावेळी मनसेचे जिल्हा सचिव सचिन तावडे, अँड प्रताप सुतार,ग्राहक पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष तेजस साळुंखे,रुपेश वारंग जयवंत पळसुले आदी उपस्थित होते.