
वैभववाडी : करूळ घाटात सरक्षंक कटडा तोडून टेम्पो दरीत झुकला. या टेम्पोला दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. सुदैवाने भीषण अपघात टळला असुन चालकाला देखील सुरक्षित बाहेर काढण्यात आले .दैवबलवत्तर म्हणूनच चालक मोठ्या अनर्थापासून वाचला. हा अपघात आज ता.१ सायकांळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला.याबाबत पोलीस ठाण्यात नोंद झाली नसली तरी टेम्पो बाहेर काढतानाचा व्हीडोओ व्हायरल झाला आहे.
आयशर टेम्पो आज सायंकाळी करूळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. घाटात असलेल्या दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. गगनबाड्यापासून तीन किमी अंतरावर एका वळणावर टेम्पो थेट सरक्षंक कटडा तोडुन दरीत झुकला.त्याच स्थितीत हा टेम्पो अडकुन राहीला होता. टेम्पोचा पुढील भाग दरीत आणि मागील भाग रस्त्यावर असा होता. मात्र टेम्पो चालकांची कॅबिन पुर्णत दरीत झुकलेली होती. कोणत्याही क्षणी हा टेम्पो दरीत कोसळु शकेल अशी स्थिती होती. हा प्रकार इतर वाहनचालकांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी टेम्पोला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घाट उतरत असलेल्या एका ट्रकला थांबवुन दोरखडांच्या सहाय्याने टेम्पोला मागे ओढण्यात आले.टेम्पोसहीत चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात झालेली नाही.