कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले महिला राज्य अधिवेशन साताऱ्यातील नायगावात !

आकाश तांबे यांची घोषणा
Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 06, 2024 10:57 AM
views 192  views

देवगड : 8 मार्च महिला दिनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले महिला राज्य अधिवेशन क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गाव सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे होणार असल्याची घोषणा राज्याध्यक्ष आकाश तांबे यांनी केली. रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या स्नेह मेळाव्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन आकाश तांबे बोलत होते.

आकाश तांबे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची भूमिका, कार्यपद्धती तसेच राज्यातील शिक्षकांच्या समस्या व भविष्यकाळात शिक्षणाचे पूर्णतः खाजगीकरण होणार आहे व खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल असल्याबाबत मार्गदर्शन करताना शिक्षकांनी जागृत राहिले पाहिजे, संघटित असले पाहिजे आणि शिक्षण चळवळीचा भाग बनले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष संजय कुर्डूकर, पी. डी सरनाईक, सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे ,रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रदीप पवार, चिटणीस प्रशांत जाधव, एस टी सेल प्रमुख कुणाल तडवी ,अतिरिक्त सरचिटणीस प्रमोद गमरे, उपाध्यक्ष दिलीप तांबे, संदीप थोरवडे, संघटक प्रल्हाद सरगर, तालुका सरचिटणीस अनिल चव्हाण, संचालक बिपिन मोहिते, हिरालाल चावरे, तालुका उपाध्यक्ष उमेश तायडे, मंडणगड तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव चिपळूण तालुकाध्यक्ष देविदास शिंदे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष युवराज कांबळे, गुहागर सचिव व तज्ञसंचालक राजेश गायकवाड, खेडचे किशोर धुत्रे इत्यादी पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक उपक्रमशील- कर्तृत्त्ववान महिला यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरणार्‍या स्री शिक्षिका यांना माता सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांना संघटनेच्यावतीन गौरवण्यात आले. या मेळाव्याचे प्रास्ताविक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे यांनी केले तर आभार सरचिटणीस अनिल चव्हाण यांनी मानले.